Satara News : मणिपूरमधील घटनांच्या निषेधार्थ सातार्‍यात मोर्चा


राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा; राष्ट्रीयता जागर अभियानच्या वतीने मागणी

Satara News : मणिपूरमधील घटनांच्या निषेधार्थ सातारा येथे आज राष्ट्रीयता जागर अभियानच्या वतीने निषेध व सहवेदना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसला. मणिपूरमध्ये होत असलेला हिंसाचार आणि देशभरात होणारे स्त्रीयांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करावा व केंद्र सरकारला तशा प्रकारचे निर्देश द्यावेत अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. 

सोमवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजता राजवाडा (गोल बागेपासून) खालच्या रस्त्याने (कर्मवीर भाऊराव पाटील पथ) हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाच्या अग्रभागी तिरंगा ध्वज घेऊन महिला कार्यकर्ती होती. मणिपूर मधील महिलांवरील अत्याचाराच्या घटना या मानवी संस्कृतीला काळिमा फासणार्‍या आहेत. या जगभर छीथू झालेल्या घटनेबाबत निषेध व सहवेदना व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढल्याचे यावेळी सांगण्यात आले. मोर्चात विविध क्षेत्रातील संवेदनशील व संविधानावर विश्वास ठेवणारे नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाच्या प्रारंभी वनिता कुंभार, सादिका बागवान, अर्पिता देवरुखकर यांनी क्रांतिकारी गाणी सादर केली.

दोषींवर तातडीने कडक कारवाई करा 

आदिवासी महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचाराला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने जबाबदार असणार्‍या दोषींवर तातडीने आणि कडक कारवाई करावी, मणिपूरमध्ये तीन महिने सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासनिक उपाय केले जावेत, देशभरामध्ये होणारे स्त्रीयांवरील अत्याचार रोखले जावेत यासाठी संविधानिक तरतुदीनुसार कायदा आणि सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चापुढे विजय मांडके, राजेंद्र शेलार, धनश्री महाडिक, तुषार भद्रे, जयश्री शेलार, नलिनी वर्पे, संजय गाडे, गणेश भिसे, शिरिष जंगम, अ‍ॅड. मनिषा बर्गे, भारत लोकरे, अनिल जाधव, रवींद्र पाटील, अमरनाथ गायकवाड, सादिका बागवान, कॉ. आनंदी अवघडे, दादा आवटे, फादर अल्वा आदींची भाषणे झाली. मोर्चात अ‍ॅड. वर्षा देशपांडे, अ‍ॅड. राजेंद्र गलांडे, जयंत उथळे, मिनाज सय्यद, चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, गौतम भोसले, डॉ. राजश्री देशपांडे, वनिता कुंभार, रजनी पवार, प्रदीप मोरे, सागर भोगावकर, बाबा भोरे, हेमा सोनी, सागर गायकवाड, डॉ. गीतांजली पोळ, राजन कुंभार, वंदना माने, उदय चव्हाण, प्रकाश खटावकर आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Manipur Issue, Rashtriyata Jagar Abhiyan 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या