वाईच्या किसनवीर महाविद्यालयातील प्राध्यापक प्रीती बोधे यांचा मृत्यू
Satara News : ब्रेक निकामी झालेली बस अचानकपणे मागे उताराला लागून पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाई - महाबळेश्वर मार्गावरील पसरणी घाटात शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. सुदैवाने सुरक्षा कठड्यामुळे बस मोठ्या संकटापासून बचावली.
प्रीती योगेश बोधे (वय ४०, रा. पाचगणी) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास योगेश दामोदर बोधे हे पत्नी प्रीतीसह दुचाकीवरून वाईहून पाचगणीला जात होते. यावेळी पसरणी घाटातील बुवासाहेब मंदिरानजीक स्वारगेटहुन महाबळेश्वरला निघालेल्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती उताराने वेगात मागे आली. बसचा ब्रेक निकामी झाला ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बस नाल्याच्या दिशेने घसरली.
लक्षात येण्याआधीच दुचाकी बसखाली
अचानकपणे बस मागे येत असल्याचे लक्षात येण्याआधीच पाठीमागून येणारी दुचाकी बसखाली सापडली. या अपघातात प्रीती बोधे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने घाटातील सुरक्षा कठड्यामुळे बस दरीमध्ये जाता जाता बचावली आहे.
किसन वीर महाविद्यालयात प्राध्यापक
प्रीती बोधे या वाई येथील किसन वीर महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय विभागात प्राध्यापक होत्या. पती योगेश पाचगणी येथील सेंट पीटर निवासी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. वाई येथील डी मार्टमध्ये साहित्य घेऊन ते दोघे पाचगणीला जात होते.
Wai - Panchgani road, Pasarani Ghat ST Bus Accident
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या