Satara Rain News : साताऱ्याच्या पश्चिम भागात मुसळधार


कोयनेच्या पाणी साठ्यात साडेचार टीएमसीने वाढ; दरडींचे सत्र सुरूच 

Satara News : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा चोवीस तासात जवळपास साडेचार टीएमसीने वाढला आहे. महाबळेश्वर व पाटण तालुक्यात रस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. दरडी हटवल्याने या रस्त्यांवरील वाहतुक आता सुरू झाली आहे.

जिल्ह्यात काल काहीसा थिजलेला पाऊस आज पुन्हा सक्रिय झाला आहे. महाबळेश्वर, पाटणसह सातारा, कराड, जावली तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरडप्रवण गावांमधील नागरिकांमध्ये संततधार पावसामुळे भीतीचे वातावरण आहे. तेथील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंत्रणा उभारली असून त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

पाटण, महाबळेश्वरमध्ये दरडी हटवल्या

जोरदार पावसामुळे आज दुपारी पाटण तालुक्यातील भोसगाव - अमृळकरवाडी रस्त्यावर दोन ठिकाणी, निगडे - चव्हाणवाडी रस्त्यावर वाझोली गावाजवळ तीन ठिकाणी, महाबळेश्वर तालुक्यात भिलार - उंबरी - घावली रस्त्यावर दोन ठिकाणी दरडी कोसळण्याचे कोसळण्याच्या घटना घडल्या. तथापि प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने तात्काळ दरड हटवून त्या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू केली. 

धोम बलकवडीचा विसर्ग वाढवला

धोम बलकवडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्यामुळे धरणातून कालपासून सुरू असलेला प्रतिसेकंद १२०० क्युसेक्सचा विसर्ग वाढवून २०२० क्युसेकपर्यंत केला आहे. जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात व कंसात आजअखेरचा पाऊस मिलिमीटरमध्ये याप्रमाणे : सातारा १६.९ (२८५.७), जावली २४.५ (५१७.४), पाटण ६४.१ (५५४.५), कराड २१.७ (१४६.२), कोरेगाव ४.८ (१२७.५), खटाव २.७ (१०१.८), माण ० (९१), फलटण ० (६७.१), खंडाळा १ (९४.७), वाई ९.४ (२१०.९), महाबळेश्वर ७४.३ (१५६३.१).

कोणाचा पाणीसाठा ४८.५१ टीएमसी

दरम्यान, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात कोयनानगरला १५८, नवजाला १९४, तर महाबळेश्वरला १४६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात प्रति सेकंद ५० हजार ५७८ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा चोवीस तासात ४.३७ टीएमसीने वाढला आहे. १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा आता ४८.५१ टीएमसी झाला आहे.

Koyna dam, Mahabaleshwar and Patan traffic affected

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या