Yavateshwar Ghat : पाषाणाच्या ठिकऱ्या... रस्त्याच्या चिंधड्या


यवतेश्वर घाटातील धोकादायक दगड फोडला; घाटरस्त्याचे झाले नुकसान
Satara News : सातारा ते कास मार्गावरील यवतेश्वर, सांबरवाडीनजीक धोकादायक ठरू शकणारा डोंगरावरील महाकाय दगड आज सार्वजनिक बांधकाम विभागाने अजस्त्र यंत्रणा वापरून फोडला. मात्र या साहसी ऑपरेशनवेळी फोडलेल्या पाषाणाचे मोठमोठे दगड घरंगळत येऊन प्रचंड शक्तीनिशी आदळल्यामुळे घाटातील डांबरी रस्त्याचे आणि संरक्षक कठड्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले. त्यामुळे 'जीवावर आले ते घाटावर निभावले' अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटल्या.
यवतेश्वर घाटात सांबरवाडीजवळ डोंगरमाथ्यावर एक महाकाय दगड होता. डोंगरकडे कोसळून लोकवस्ती गाडली जाण्याच्या अलीकडच्या काळातील घटनांमुळे या महाकाय दगडाची परिसरातील जनतेने दहशत घेतली होती. भूस्खलनामुळे हा महाकाय दगड कोणत्याही क्षणी घरंगळत येईल व होत्याचे नव्हते करेल या भीतीच्या छायेखाली लोक वावरत होते. 
जीवावर आले ते रस्त्यावर निभावले
या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने हा संभाव्य धोका नष्ट करण्यासाठी आज सातारा - कास मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून अजस्त्र यंत्रणेचा वापर करून हा महाकाय दगड फोडला. मात्र त्याच्या उडालेल्या ठिकऱ्या घाट रस्त्यात कोसळून डांबरी रस्त्याचे अपरिमित नुकसान झाले. घाटाच्या संरक्षक कठडेही तुटले. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला. एकीकडे महाकाय दगडाच्या धोक्यापासून सुटका झाली तर दुसरीकडे रस्त्यावर नवीन संकट आले. त्यामुळे 'जीवावर आले ते रस्त्यावर निभावले' अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटल्या.
नुकसान झालेल्या रस्त्याची डागडुजी
दरम्यान, यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकसान झालेल्या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात आली आहे. तसेच कठडे तुटलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत. सध्या तरी या मार्गावरील वाहतूक बंदच ठेवली आहे.
Yavateshwar - Kaas road disaster management 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या