Mahavitaran News : विद्युत वाहनांसाठी वीजविक्रीत तिप्पट वाढ


राज्यात केवळ दहा महिन्यात वाढला दहा दशलक्ष युनिट वीजवापर

Mahavitaran News : राज्यामध्ये विजेवर चालणार्‍या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री सप्टेंबर २०२२ मधील ४.५६ दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली आहे. वीजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी दिली.

महावितरण ही महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणार्‍या वाहनांसाठी महावितरणच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टीने मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे अशी विविध कामे महावितरणकडून केली जातात.

राज्यात ३२१४ चार्जिंग स्टेशन्स 

राज्यात महावितरणची आणि खासगी अशी एकूण ३ हजार २१४ चार्जिंग स्टेशन आहेत. त्या माध्यमातून वाहनांसाठी झालेली विजेची विक्री ध्यानात घेतली तर वेगाने वाढ झालेली दिसते. वाहनांसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये राज्यात ४.५६ दशलक्ष युनिट विजविक्री झाली होती, मार्च २०२३ मध्ये ही विक्री ६.१० दशलक्ष युनिट झाली, तर जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली.

विजेवर चालणार्‍या बसेसही वाढल्या

राज्यातील विद्युत वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. २०१८ साली राज्यात ४ हजार ६४३ विद्युत वाहनांची विक्री झाली होती, तर २०२२ साली १ लाख ८९ हजार ६९८ विद्युत वाहनांची विक्री झाली होती. राज्यात ३१ मार्च २०२३ अखेर एकूण विद्युत वाहनांची संख्या २ लाख ९८ हजार ८३८ झाली आहे. या सुमारे तीन लाख विद्युत वाहनांमध्ये दुचाकी वाहनांची संख्या अडीच लाख आहे. विजेवर चालणार्‍या बसेसची संख्या राज्यात झपाट्याने वाढली आहे. राज्यात २०१८ साली केवळ चार विद्युत बसेसची नोंदणी झाली होती. २०२२ साली ही संख्या ३३६ झाली. मार्च २०२३ अखेर राज्यात एकूण १३९९ विद्युत बसेस होत्या.

पर्यावरण रक्षणासोबतच पैशाची बचत

विद्युत वाहनांमुळे पर्यावरण रक्षणाला मदत करण्यासोबतच पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते. पेट्रोलवर चालणार्‍या पारंपरिक दुचाकी वाहनाला इंधनाचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे २ रुपये १२ पैसे येतो, तर विद्युत दुचाकीला प्रति किलोमीटर ५४ पैसे खर्च येतो. पेट्रोलियमवर चालणार्‍या चार चाकी वाहनाला प्रति किलोमीटर सुमारे ७ रुपये ५७ पैसे खर्च येतो तर विद्युत चार चाकीला प्रति किलोमीटर १ रुपया ५१ पैसे खर्च येतो. तीनचाकी गाडीचा प्रति किलोमीटरचा खर्चही पेट्रोलियमसाठी सुमारे ३ रुपये २ पैसे तर विजेसाठी ५९ पैसे आहे.

Mahavitaran - Nodel Agency, Electric Vehicle Charging Stations In Maharashtra

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या