Sada Waghapur News : सडावाघापूरला हुल्लडबाजांवर कारवाईचा ‘धबधबा’


दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांना पोलिसांचा दणका; १४ जणांवर गुन्हे दाखल

Sada Waghapur News : पाटण तालुक्यातील सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी जाणार्‍या हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांनी नाकाबंदी करून कारवाई केली. त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणार्‍या १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

सडा वाघापूर येथे सुटीच्या दिवशी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात एका दाम्पत्याला मारहाण झाली होती. वारंवार हुल्लडबाजीचे प्रकार घडत असल्याने उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या मार्गदर्शनाखाली तारळे येथे नाकाबंदी करून सडा वाघापूरला जाणार्‍या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. 

कारवाईमुळे वाहनचालकांची भंबेरी

यावेळी हुल्लडबाजी करणार्‍या व दारू पिऊन वाहन चालविणार्‍या तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणार्‍या तरुणांवर कडक कारवाई करण्यात आली. तसेच अवैध प्रवासी वाहतूक, वाहतुकीस अडथळा करणार्‍या अशा प्रकारे एकूण ३० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अचानक वाहनांची तपासणी सुरू केल्याने वाहनचालकांची भंबेरी उडाली.

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या मार्गदर्शनाखाली तारळे दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, नंदू निकम, राजकुमार कोळी, सुनील लोहार, सचिन जगताप, हेमंत पाटील, कृष्णात अवघडे आदिंनी या कारवाईत सहभाग घेतला.

Sada Waghapur Reverse Fall, Action against Hooligan Tourist By Tarale Police, Satara Police 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या