Satara Crime News : लोणंदमध्ये पकडला गांजाचा साठा


स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पोलीस अभिलेखावरील आरोपी जेरबंद

Satara Crime News : खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील मार्केट यार्ड परिसरात गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या पोलीस अभिलेखावरील गुन्हेगाराना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून ३ लाख ६७ हजार १०० रूपयांचा १४ किलो ६८४ ग्रॅम गांजा व १४ लाख रूपये किंमतीची स्विफ्ट व स्विफ्ट डिझायर अशी दोन वाहने जप्त केली आहेत.

उपलब्ध मंगलेश भोसले (वय ३५, रा. सोनगाव, ता. बारामती, जि. पुणे) व माल विकत घेणारा चेतन वामन जाधव (वय ३३, रा. जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. उपलब्ध भोसले हा पोलीस अभिलेखावरील आरोपी असून त्याच्याविरूध्द पुणे जिल्ह्यातील बारामती तसेच सोलापूर जिल्ह्यातील करकंभ, माळशिरस व नातेपुते पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

कारवाई करण्याच्या सूचना

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करुन त्यांना जिल्ह्यात गांजाची विक्री, वाहतूक, लागवड करणार्‍या इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लोणंद पोलिसात गुन्हा दाखल

पोलीस अभिलेखावरील आरोपी उपलब्ध मंगलेश भोसले हा स्विफ्ट डिझायर (एमएच ११ बीएच ९०५५) मधून अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीशीर माहिती अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत शनिवारी (दि. २६) प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश पथकाला दिले. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या कब्जातून उपरोक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरूध्द लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्वेâ, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, साबीर मुल्ला, हसन तडवी, मुनीर मुल्ला, मोहसिन मोमीन, धीरज महाडीक, शिवाजी गुरव, अमृत कर्पे आदिंनी सहभाग घेतला होता.

Satara Local Crime Branch, Satara Police, Lonand Police Station

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या