Satara News : औंधचे एपीआय, एएसआय अडकले जाळ्यात


गुन्ह्यात मदत करण्यासाठी, 'त्रास' न देण्यासाठी घेतली लाखाची लाच
Satara News : दारूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी व इथून पुढे व्यवसायात कोणताही 'त्रास' न देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब नारायण जाधव (वय ५४) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली ते ज्या पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत, त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
या प्रकरणातील तक्रारदार यांच्या परमिट रूममधून दारूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि यापुढे कोणताही त्रास न देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये ठरले. ही लाच त्यांच्या वतीने बापूसाहेब जाधव हे स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने औंधमधील जुन्या एसटी स्टँड परिसरात  आज सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले.


सापळा पथकामध्ये सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य, पोलीस नाईक निलेश चव्हाण, पोलीस शिपाई तुषार भोसले, निलेश येवले यांचा समावेश होता. 
Anti corruption bureau, Aund Police Station, Satara Police  

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या