Satara News : शरद पवार शुक्रवारी दहिवडीत


दादांच्या बंडानंतर योध्दा रणांगणात; जाहीर सभेकडे जिल्हावासीयांचे लक्ष

Satara News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर खासदार शरद पवार राज्यभर विविध मतदारसंघात दौरे करुन तेथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे काम करत आहेत. यातून भाजपसह अजित पवार गटावर ते सडेतोड टीका करत आहेत. आता येत्या शुक्रवारी २५ ऑगस्टला खासदार शरद पवार यांची दहिवडी (ता. माण) येथे जाहीर सभा व कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे. 

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर खासदार शरद पवार प्रथम कराडला प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी आले होते. त्यानंतर महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या निर्धाराने ते बाहेर पडले असून त्यादृष्टीने त्यांचा हा सातारा जिल्हा दौरा  कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा ठरणार आहे. येत्या २५ तारखेला कोल्हापूरला जाहीर सभेच्या निमित्ताने जाताना खासदार शरद पवार बारामतीवरून फलटणमार्गे दहिवडी येथे येणार आहेत. दहिवडीत त्यांच्या उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रम होणार आहेत.

कोल्हापूरपर्यंत कार्यकर्त्यांची रॅली

शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्यांचे दहिवडीत आगमन होईल. सव्वा दहा ते अकरा या वेळेत दहिवडी कॉलेजमध्ये गरजू मुलींना पाचशे सायकलचे वाटप त्यांच्या हस्ते होईल. सव्वा अकरा ते पावणे बारा वाजेपर्यंत दहिवडी नगरपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दहिवडी येथील बाजार पटांगणावर कार्यकर्ता संवाद मेळावा (जाहीर सभा) होईल. अडीच वाजता दहिवडी येथून वडूज, पुसेसावळी, कराडमार्गे ते कोल्हापूरकडे रवाना होतील. कोल्हापूरच्या जाहीर सभेसाठी जाताना असंख्य कार्यकर्ते रॅलीने त्यांच्यासोबत जाणार आहेत.

NCP President Sharad Pawar In Action Mode, Public Meeting In Dahiwadi

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या