Satara News : साताऱ्यातून बहिण भावाला अटक


अपत्य प्राप्तीसाठी औषधाचे आमिष; सातारा कनेक्शन उघड

Satara News : अपत्य होत नसल्याने दुःखीकष्टी असलेल्या दांपत्याला अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून त्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या गुन्हेगार टोळीचे सातारा कनेक्शन उघड झाले असून तळबीड पोलिसांनी साताऱ्यातून बहिण भावाला अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

शाही एजन्सी नावाने साताऱ्यात राधिका रोडला युनानी व आयुर्वेदिक औषध दुकान चालवणारा इलियास रशीद शेख व त्याची बहीण रेश्मा रशीद शेख (रा. करंजे पेठ, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांनी अशाच पद्धतीने भोंदूगिरी करत जिल्ह्यात अनेकांना गंडा घातल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. साताऱ्यातून उचललेल्या इलियास व रेश्मा शेख यांचाही या टोळीत सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

संशयितांना पोलीस कोठडी 

अपत्य प्राप्तीचे आमिष दाखवून या टोळीकडून त्यासाठीच्या औषधासाठी लाखो रुपये उकळले जात होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने कराड तालुक्यातील तळबीडच्या दाम्पत्याने तळबीड पोलिसात तक्रार नोंदवली. त्यामुळे या टोळीचा भांडाफोड झाला. इलियास व रेश्मा या बहीण भावाला आज कराड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करत आहेत.

Sakri, Dist. Dhule, Talbeed Police Station

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या