लॉज चालकांकडून नियम धाब्यावर; पोलीस यंत्रणेचे कानावर हात
Satara News : पैशाच्या हव्यासापोटी नियम धाब्यावर बसवून महाविद्यालयीन युवक - युवतींना अश्लील चाळे करण्यासाठी कराड तालुक्यातील मसूर हद्दीतील लॉजवर खोल्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याच्या प्रकाराची पोलखोल झाली आहे. मात्र पोलीस यंत्रणेने याबाबत 'नरो वा कुंजरोवा' अशी भूमिका घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मसूर गावच्या हद्दीत असणाऱ्या एका लॉजवर काही महाविद्यालयीन युवक व युवती शनिवारी आले असल्याची कुणकुण लागल्याने प्राचार्यांच्या परवानगीने रेक्टरने या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी युवक व युवती मिळून आले. या घटनेची एकच चर्चा दिवसभर मसूरमध्ये सुरू होती.
स्टिंगमधून गैरप्रकारांना पुष्टी
महाविद्यालयीन युवक व युवती कॉलेजच्या नावाखाली लॉजवर येऊन अश्लील चाळे करत असल्याच्या अनेक दिवसापासून चाललेल्या चर्चेला त्या जागरूक महाविद्यालयामुळे एकप्रकारे पुष्टीच मिळाली. यातून नियम धाब्यावर बसवून लॉज मालक सर्रास अश्लील चाळे करण्यासाठी विद्यार्थी - विद्यार्थिनींना खोल्या उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या घटनेबाबत पोलीस स्टेशनला संपर्क केला असता याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, महाविद्यालयाच्या नावाखाली मसूर हद्दीत असणाऱ्या लॉजवर मोठ्या प्रमाणात युवक - युवतींचे येणे-जाणे असून, या लॉजवर गैरप्रकार होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. लॉजवर अनेकदा युवक-युवतींचा राबता असतो. त्यामुळेच त्या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याची बाब नागरिकांमध्ये चर्चीली जात आहे.
गैरप्रकारांना पायबंद घालण्याची गरज
पोलीस यंत्रणेकडून नेहमी लॉजिंग, हॉटेल आदींची माहिती घेत चौकशी केली जाते. जेणेकरून लॉजवर मुक्कामी असणाऱ्या संशयास्पद गुन्हेगारांचा शोध घेतला जाऊ शकेल. मात्र या घटनेमुळे पोलिसांनी वेळोवेळी लाॅजची तपासणी करून अशा घटनांना पायबंद घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या