मसूर नं. १ सोसायटी कामकाजातही नंबर १ आणि तालुक्यातही नंबर १
Satara News : शेतकरी सभासदांना उत्कृष्ट सेवा सुविधा देत जिल्हास्तरावर आदर्शवत कामकाज केल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणानिमित्त मसूर नं. १ विकास सेवा सोसायटीला 'अमृत गौरव पुरस्कार' तसेच तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आला.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीने व्यवसायात वृद्धी करत, कर्ज वाटपासोबत कर्ज वसुलीत प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे नफ्यात वाढ होऊन सभासदांना लाभांश वाटप करण्यात आला. या एकूणच कामगिरीबद्दल जिल्हा बँकेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान
याप्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, रामराजे नाईक - निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मानसिंगराव जगदाळे, बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, लहूराज जाधव, सोसायटीचे चेअरमन शहाजीराव जगदाळे, व्हाईस चेअरमन अभिजीत घाडगे, सोसायटीचे सचिव दिनकर शिरतोडे, सहसचिव शहजादे पिरजादे, सोसायटीचे संचालक रमेश जगदाळे, पंढरीनाथ देसाई, वसंत निकम, अशोक कांबिरे, सचिन जगदाळे, हनुमंत जाधव, मारुती वाघमारे, संतोष बरकडे, सुरेश रासकर यांच्यासह सोसायटीचे संचालक व सभासद उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या