Satara News : सातारची अपूर्वा मेट्रोची लोको पायलट


उद्घाटनाच्या फेरीचे केले सारथ्य; सातारकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Satara News : पुण्यातील मेट्रो या ड्रीम प्रोजेक्टचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या ऐतिहासिक क्षणी उद्घाटनाच्या फेरीचे सारथ्य करण्याचा आणि अर्थातच पुणे मेट्रोची पहिली महिला लोको पायलट होण्याचा मान सातारची कन्या अपूर्वा अलाटकर हिला मिळाला. यामुळे सातारकरांचा उर अभिमानाने भरून आला असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मेट्रोच्या वतीने पुण्यात चार मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या लोकार्पणाची तयारी प्रशासनातर्फे सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे ठरल्यानंतर चारही मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो चालवण्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण सुरू केले. या प्रशिक्षणामध्ये अपूर्वाचादेखील समावेश होता. हे दीड महिन्याचे खडतर प्रशिक्षण तिने पूर्ण केले.

... आणि मेट्रो मार्गस्थ झाली

मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी नियोजनानुसार वनाज येथील मेट्रोत अपूर्वा 'मास्क ऑन की'सह सज्ज होती. पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला व अपूर्वाने 'मास्क ऑन की'चा वापर करत मेट्रो रुबी हॉल क्लिनिककडे मार्गस्थ केली. जबाबदारी, अपेक्षांचे ओझे व सर्वांच्या खिळलेल्या नजरांना आश्वासकपणे सांभाळत तिने उद्घाटनाची फेरी पूर्ण केली व यशस्वी लोको पायलट होण्याचा मान मिळवला.

स्वप्नात वाटले नव्हते, ते सत्यात उतरले!

शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांगल्या संधीच्या शोधात होते. ती संधी मेट्रोमुळे मिळाली. माझ्याकडे मेट्रोचे स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी होती; पण दुसऱ्या जबाबदारीकडे जाण्याची संधी मंगळवारी मला मिळाली. मेट्रो चालवायची संधी मिळेल, असे स्वप्नातही वाटत नव्हते. पण तो मान मला मिळाला. यासाठी सर्वांचे पाठबळ, आशीर्वाद कामी आले.

- अपूर्वा अलाटकर, लोको पायलट

Apurva Alatkar, the first loco pilot in Pune metro, dream project of PM Narendra Modi 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या