Satara News : पुणे मेट्रोची पहिली महिला लोको पायलट होण्याचा मान मिळवणारी अपूर्वा अलाटकर ही आहे तरी कोण याबद्दल सर्वांनाच कमालीची उत्सुकता आहे. एका सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे येऊन या मुलीने असे स्वप्नवत यश मिळवणे हा मात्र सर्वांसाठीच कौतुकाचा विषय झाला आहे.
सातारच्या शाहूपुरीतील रांगोळे कॉलनीत राहणाऱ्या उज्ज्वला व प्रमोद अलाटकर यांची अपूर्वा ही कन्या. तिचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील बापूसाहेब चिपळूणकर शाळेत झाले. यानंतर तिने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण अनंत इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले.
सोलापुरात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण
दहावीनंतर तिने सोलापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने सज्जनगडजवळील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये त्याच शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिला पुणे येथील कल्याणी उद्योग समूहात नोकरीची संधी मिळाली. तेथे काम सुरू असतानाच लॉकडाऊन जाहीर झाल्याने ती साताऱ्यात परतली.
२०१९ मध्ये पुणे मेट्रोच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रियेची तिला माहिती समजली. त्यानुसार तिने अर्ज केला. विशेष म्हणजे मेट्रोकडून पहिल्या फेरीसाठी तिला बोलावण्यात आले. तीनही फेऱ्यांमधील सर्व निकष, कठीण पातळ्या पूर्ण करत फेब्रुवारी २०२३ मध्ये अपूर्वाने मेट्रोतील सेवेत आपले स्थान पक्के केले.
सातारकरांसाठी निश्चितच अभिमानास्पद
साताऱ्यातून प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जात ती पुणे मेट्रोत लोको पायलटच्या आसनावर विराजमान झाली. तिचे स्टार इतके बुलंद, की पुणे मेट्रोच्या उद्घाटनाच्या फेरीचे सारथ्य करण्याचा बहुमान तिला प्राप्त झाला. सातारकरांसाठी निश्चितच हे अभिमानास्पद आहे.
Apurva Alatkar, the first loco pilot in Pune metro, completed mechanical engineering degree in Government engineering College (Solapur), Dyanashree institute (Sajjangad)
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या