Satara News : डॉ. संगीता कोल्हापुरेंना संगीतरत्न पुरस्कार


गायन क्षेत्रातील योगदानाबद्दल गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने सन्मान 

Satara News : सातारा येथील प्रथितयश शास्त्रीय गायिका डॉ. सौ. संगीता सतीश कोल्हापुरे यांना पंडित विष्णू दिगंबर पलुसकर संगीतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याबरोबर गायन क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वाशी, मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. 

गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य पदवी 

सौ. संगीता कोल्हापुरे यांनी भेंडी बझार घराण्याच्या बुजुर्ग गायक, गुरूंकडून शास्त्रीय संगीताची तालीम घेतली. बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठ येथे १९६७ साली संगीत विषय घेऊन बी. ए. पदवी घेतली. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथे १९८७ साली एम. ए. पदवी प्राप्त केली. १९९३ मध्ये गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य (पीएचडी) ही पदवी प्राप्त केली. 

दूरदर्शन, आकाशवाणीवर कार्यक्रम

त्यांनी सातारा येथे सूर वर्धिनी संस्थेची स्थापना करून अनेक शिष्य तयार केले. गेली सहा दशके त्या संगीत साधना करत असून त्यांनी दूरदर्शन, आकाशवाणीवर स्वर धारा, सुगम संगीत तसेच राम रंगी रंगले, वाणी स्त्री संतांची हे कार्यक्रम सादर केले. सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे.

Gandharv mahavidyalay, pandit Vishnu Digambar Paluskar Sangeet Ratna award 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या