Satara News : मसूर (ता. कराड) येथील संदीप बाजीराव वायदंडे (वय ३९) या युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत झाला. ही घटना सोमवारी (दि. २८) सकाळी आठच्या दरम्यान घडली. या घटनेने मातंग समाजावर दु:खाची छाया पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
मसूरमधील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव वायदंडे यांचा संदीप हा कनिष्ठ चिरंजीव होता. मसूरजवळील शहापूर येथे त्याच्या दुकानाशेजारील सीमा लक्ष्मण मंद्रुळकर यांनी बांधलेल्या नवीन घराच्या वास्तूशांतीनिमित्त सोमवारी सकाळी घराला तोरण बांधण्यासाठी संदीप गेला होता. तोरण बांधत असताना घराजवळून गेलेल्या विद्युत वाहक तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. संदीप याचा मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
सर्वांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्त्व
मातंग समाजातील अत्यंत कष्टाळू, सतत हसतमुख, निर्व्यसनी आणि सर्वांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून संदीपला ओळखले जात होते. त्याचा मित्रपरिवारही मोठा असून तो केटरिंग व भाजीपाला या व्यवसायाबरोबरच रिक्षावर कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. त्याच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार, नातेवाईक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या