Satara News : 'राजवंश'च्या सदस्यांना ओळखपत्र वितरण


संस्थापक खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर येथे कार्यक्रम

Satara News : आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी उघडण्यात आलेल्या राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या व्यापाऱ्यांना संघटनेचे संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. 

संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार यांच्या माध्यमातून या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. कोरोना काळामध्ये अगदी गोरगरीब व्यापाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेली संघटना म्हणून राजवंश आठवडा बाजार संघटनेकडे पाहिले जाते. काही दिवसांपूर्वी संघटनेतील एका व्यापाऱ्याचा आकस्मितरित्या मृत्यू झाला होता. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून संघटनेच्या माध्यमातून आपल्या बांधवाला आर्थिक मदत केली. ही मदत संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार व पदाधिकाऱ्यांनी थेट त्यांच्या घरी जावून दिली. या आर्थिक मदतीमुळे त्या कुटुंबाला उदरनिर्वाह करता आला.


सदस्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

रविवारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांची ओळखपत्रे संघटनेचे संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथे वितरण करण्यात आली. 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार, उपाध्यक्ष मुकुंदराज काकडे, सचिव अर्जुन आवटे, खजिनदार गणेश कुर्ले, संचालक आण्णा कांबळे, संभाजी पिसाळ, दिलीप चव्हाण, मंगेश जाधव, जालिंदर शिंदे, गणेश नवघणे, संतोष ठिगळे, अजय कुर्ले, अमोल खरात, रेखा कारंडे, भारती जाधव, शारदा साळुंखे, रंजना साळुंखे, संगीता साळुंखे, रेखा साळुंखे, लक्ष्मी साळुंखे, सुनिता साळुंखे, पमुबाई माने, नगरसेवक राजेंद्र वैराट, करण पंडित, सिद्धार्थ पाटणकर, नंदू धोंगडे तसेच राजवंश बाजार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MP Udayanraje Bhosale, Rajwansh Sanghatana, I card distribution 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या