चोरटे सीसीटीव्हीत कैद; खंडाळ्यात एकाच मंदिरात वर्षभरात दोनवेळा प्रकार
Satara News : खंडाळा येथील रहदारीच्या चौकातील व शहराच्या गावठाण असणार्या शिवशक्ती ग्रामविकास मंडळाच्या गणेश मंदिरातील दानपेटीवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला आहे. हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याच मंदिरातून ही दानपेटी गेल्या वर्षापासून दोनदा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खंडाळा येथील श्रीराम गाढवे हे पहाटे पाच वाजता दर्शनाला गेले असता, मंदिरातील सभामंडपाचा दरवाजा उघडा दिसला. त्यांना शंका आल्याने आत गेले असता त्यांना आतमधील दानपेटी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ही बाब मंडळाच्या पदाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये हा अज्ञात चोरटा दानपेटी घेऊन जाताना कैद झाला आहे.
खंडाळा पोलिसात गुन्हा दाखल
अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या या गणपती मंदिरात ही चोरी झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या घटनेची फिर्याद जितेंद्र गाढवे यांनी दिली असून, ५० हजार रुपये रोख व पाच हजार रुपयांची दानपेटी असा ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या