अश्वमेध वाचनालय करणार साहित्यिकांचा सन्मान; १० सप्टेंबरला वितरण
Satara News : सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने (कै.) भास्करराव ग. माने स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी देण्यात येणार्या 'अक्षरगौरव पुरस्कार २०२२' ची घोषणा नुकतीच करण्यात आली. या पुरस्कारांचे वितरण दि. १० सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये मान्यवरांच्या हस्ते होईल, अशी माहिती ग्रंथालयाचे संस्थापक डॉ. रवींद्र भारती - झुटिंग यांनी दिली.
संस्थेच्या वतीने यापूर्वी कवी संदीप खरे, व. बा. बोधे, कृष्णात खोत, परशुराम देशपांडे, वामन काळे, श्रीकांत घोंगडे, मंजुश्री गोखले, नवनाथ गोरे, विश्वास नांगरे - पाटील आदिंना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष शशिभूषण जाधव, कार्याध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे.
हे आहेत पुरस्कारांचे मानकरी
राज्यस्तरीय अक्षरगौरव साहित्य पुरस्कार (प्रत्येकी २५०० रुपये व सन्मानचिन्ह) मध्ययुगीन दलित संत कविता सामाजिक व वाङमयीन मूल्यमापन - संकीर्ण (डॉ. संदीप सांगळे, पुणे), नाती वांझ होताना - कवितासंग्रह (मनीषा पाटील - हरोलीकर), सातारा जिल्ह्यातील लेखक अक्षरगौरव साहित्य पुरस्कार (प्रत्येकी एक हजार रुपये व सन्मानचिन्ह) : संघर्ष हे सामर्थ्य - आत्मकथन (रवींद्र खंदारे), चित्रभाषा - संकीर्ण (नीलेश महिगावकर), योद्धा - कथासंग्रह (विशाल बनकर), अन्वयांची अक्षरलिपी - कवितासंग्रह (डॉ. राजश्री देशपांडे).
अक्षरगौरव साहित्य विशेष पुरस्कार (प्रत्येकी एक हजार रुपये व सन्मानचिन्ह) : मोठ्या बँकेची छोटी गोष्ट - आत्मकथन (विनोद कुलकर्णी), हरवलेल्या कथांच्या शोधात - कथासंग्रह (सीताराम सावंत), गौरवशाली पुसेगाव - लेखसंग्रह (दिनेश फडतरे), जाणीव - कथासंग्रह (नंदकुमार शेडगे), रे आभाळा - कवितासंग्रह (रामकली पावसकर), आरोग्यविषयक ग्रंथांसाठी डॉ. श्रीकांत कारखानीस यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा अक्षरगौरव साहित्य पुरस्कार (एक हजार रुपये व स्मृतिचिन्ह) : ते पंधरा दिवस (विलास वरे).
Ashwamedh Library, Akshar Gourav Award, Pathak Hall, Nagar Wachanalay, Satara
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या