खेडमधील घटना; पाटणच्या भोंदूबाबासह दोन साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल
Satara News : मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्या महिलेला ती राहत असलेल्या घरातील गुप्तधन तांत्रिक पूजा, होमहवन करून काढून देतो असे सांगून तब्बल ४१ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १ मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत खेड तालुक्यातील भरणे येथे घडला आहे. याप्रकरणी पाटण येथील भोंदूबाबासह त्याच्या इतर दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोंदूबाबा प्रसाद हरिभाऊ जाधव (वय ४७, रा. गिरेवाडी, ता. पाटण), विवेक यशवंत कदम (वय ४८), ओंकार विकास कदम (वय २३, दोघे रा. करंजवडे, ता पाटण) अशी तिघांची नावे आहेत. याप्रकरणी विठाबाई आण्णाप्पा पवार (वय ४८, रा. गणेशनगर, भरणे नाका, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.
ग्रहशांतीच्या नावाखाली मुलालाही गंडा
विठाबाई पवार या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्या राहत असलेल्या घरात गुप्तधन असून यासाठी तांत्रिक पूजा, धार्मिक विधी व जादूटोण्याचे उपाय करून हे गुप्तधन काढून देतो, असे भोंदूबाबा प्रसाद जाधव याने त्यांना सांगितले. त्यासाठी घरात तंत्रमंत्र वाचून, पूजापाठ करून तसेच होमहवन आणि इतर धार्मिक विधी करण्यासाठी पैसे लागतील असेही त्याने सांगितले. त्यासाठी त्याने विठाबाई पवार व त्यांच्या नातेवाइकांकडून वेळोवेळी एकूण ४० लाख ६५ हजार रुपये घेतले. त्यानंतर विठाबाई यांचा मुलगा रोहित याच्या ग्रहशांती करण्यासाठी या भोंदूबाबाने २५ हजार रुपये वेगळे मागून घेतले. भोंदूबाबा प्रसाद जाधव आणि त्याच्या दोन साथीदारांनी तब्बल ४० लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
Khed, Dist. Ratnagiri, Cheeting Case, Satara Police
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या