Satara News : पाटण तालुक्यात शस्त्रांसह तिघांना अटक


दहशत माजवण्यासाठी सांगली, कोल्हापुरातून आले आणि पोलिसांना सापडले

Satara News : दहशत माजविण्याच्या उद्देशाने पाटण तालुक्यात आलेल्या तीन युवकांना मल्हारपेठ पोलिसांनी धारदार शस्त्रांसह अटक केली. स्वप्नील तानाजी हिप्पकर (वय २०, रा. कर्नाळा रोड, रामनगर, सांगली), सूरज भगवान कोळी (वय २६, निकम गल्ली, सातवे, ता. पन्हाळा), किशोर महादेव नाईक ( वय २२, रा. उमाजीनगर दानोळी, ता. शिरोळ) अशी संशयितांची नावे आहेत. 

कराड ते चिपळूण मार्गावरील पांढरवाडी गावच्या हद्दीत पांढर्‍या रंगाची कार (एमएच १० सीए ९३५९) ही रस्त्याच्या कडेला संशयितरीत्या उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता गाडीत तिघे बसल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडून गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत तलवार, पारशी सुरा व नेपाळी कुकरी अशी तीन धारदार शस्त्रे मिळून आली.

धारदार हत्यारे व कार हस्तगत 

याबाबत संशयितांकडे अधिक चौकशी केली असता दहशत माजवण्याच्या इराद्याने ही हत्यारे बाळगल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याजवळील हत्यारे व कार असे मिळून एकूण ४ लाख १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलिसांनी केली. संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पृथ्वीराज पाटील करत आहेत.

Criminals From Sangli And Kolhapur Districts, Arrest in Patan Taluka

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या