Satara News : संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा मसूरमध्ये निषेध


समाजात तेढ निर्माण करणार्‍या अशा प्रवृत्तींना पायबंद घालण्याची मागणी

Satara News : संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल काढलेल्या अवमानकारक वक्तव्याचा तसेच याप्रकरणी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत भिडे यांच्यावर कारवाईची मागणी केल्यानंतर त्यांना धमकी देण्याच्या प्रकाराचा कराड तालुक्यातील मसूर येथे जुन्या बस स्थानक चौकात जाहीर निषेध करण्यात आला. तसेच समाजात तेढ निर्माण करणार्‍या अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, पी. डी. पाटील बँकेचे संचालक बाळासाहेब जगदाळे, सह्याद्री कारखान्याचे संचालक तानाजीराव जाधव, प्रा. कादर पिरजादे, ग्रामपंचायत सदस्य बंडा चव्हाण, वामनराव शिरतोडे, शेखर जगदाळे, भाऊसाहेब बर्गे, संभाजीराव बर्गे, अनिल जेधे, किशोर जगदाळे, सुनील माळी, गणेश मोरे, प्रकाश जाधव, धीरज जगदाळे, प्रदीप जैन, आनंदराव जाधव, संजय जाधव, सतीश बाजारे, लहू मोरे, असलम बागवान, महेश वायदंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Mahatma Gandhi, Fotmar Chief Minister Prithviraj Chavan, Sambhaji Bhide, Masur

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या