Satara News : वाई न्यायालयात मोक्कातील आरोपींवर गोळीबार


वकिलाच्या वेशात आलेल्याने फाईलमधून पिस्तुल काढून गोळ्या झाडल्या

Satara News : वाई येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सोमवारी दुपारी न्यायालय कक्षाबाहेर व्हरांड्यात खंडणी व दरोडा प्रकरणातील मोक्का लागलेला आरोपी अनिकेत उर्फ बंटी जाधव व त्याच्या साथीदारांवर वकिलाच्या वेशात आलेल्या एकाने बेछूट गोळीबार केला. तथापि, पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या थरारनाट्यामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळजनक उडाली. पोलिसांनी याप्रकरणी गोळीबार करणार्‍याला ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर न्यायालय परिसरात व शहरात नाकाबंदी करण्यात आली.

राजेंद्र चंद्रकांत नवघणे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मेणवली (ता. वाई) येथील हॉटेल माधवन इंटरनॅशनलच्या मालकास दि. १ जून रोजी दहा लाखांच्या खंडणीची मागणी करून दरोडा टाकल्याप्रकरणी पंधरा जणांवर वाई पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात कुख्यात गुंड व मोक्का लागलेला आरोपी अनिकेत उर्फ बंटी जाधव (रा. भुईंज, ता. वाई), निखिल व अभिजीत शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) यांना कळंबा कारागृहातून ताब्यात घेऊन शनिवारी (दि. ५ ऑगस्ट) न्यायालयात हजर केले होते. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला 

पोलीस कोठडी संपल्याने आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती सी. व्ही. शिरसाट यांच्या न्यायालयात कामकाज सुरू असल्याने त्यांना न्यायालय कक्षाबाहेर व्हरांड्यात बसवले होते. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. वकील आरोपींशी चर्चा करत होते. यावेळी वकिलाच्या वेशात आलेल्या एकाने फाईलमध्ये दडवलेल्या पिस्तुलातून दोन गोळ्या आरोपींवर झाडल्या. यावेळी त्याला पोलिसांनी हटकल्याने गोळी भिंतीवर व जमिनीवर लागली. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. गोळीबार करणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. यावेळी तो फिर्यादी राजेंद्र चंद्रकांत नवघणे असल्याचे समोर आले. 

Firing in Wai Court, Satara Police, Accuse in Mokka 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या