Satara News : अजय गोरड यांचा मसूरमध्ये सत्कार


गुन्हेगारांना जरब बसवत गोरड यांनी कर्तबगारीतून ठसा उमटवला

Satara News : सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी गुन्हेगारांना जरब बसवलीच, शिवाय अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवत कामाचा ठसा उमटवला. आपल्या कर्तबगारीतून त्यांनी उंब्रज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वेगळे नाते निर्माण केले, असे उद्गार माजी सहकारमंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी काढले.

उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांची बदली कराड शहर पोलीस ठाण्यात झाल्याने त्यांच्या कर्तबगारीचा गौरव व्हावा या विचारातून मसूर (ता. कराड) येथे त्यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गोरड यांनी गावोगावी सीसीटीव्ही कॅमेराची संकल्पना राबवली. मसूर पोलीस ठाण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

सत्काराने चांगल्या कामासाठीची ऊर्जा !

पोलीस ठाण्यात येणार्‍या लोकांना सन्मानाची वागणूक देण्याचा आपला प्रयत्न राहिला. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला. कोरोना काळात १५ लाख दंड वसुली झाली. ही वसुली गावोगावी चांगल्या कामासाठी दिली. ७५ टक्के गावे सीसीटीव्ही कॅमेराखाली आणली. या नागरी सत्काराने आणखी चांगल्या कामासाठीची ऊर्जा मिळाली, अशा शब्दात अजय गोरड यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, डॉ. विजय साळुंखे, रमेश चव्हाण, सरपंच पंकज दीक्षित, कादर पिरजादे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपसरपंच विजयसिंह जगदाळे, सातारा मध्यवर्ती बँकेचे संचालक लहूराज जाधव, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, संजय थोरात, अशोक संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रवी जाधव यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. शिकंदर शेख यांनी सूत्रसंचालन केले. पोलीस पाटील तिलोत्तमा वेल्हाळ यांनी आभार मानले.

Satara Police, Transfers Of Police Officers, API Ajay Gorad

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या