Satara News : आक्षेपार्ह पोस्टमुळे सातारा शहरात तणाव


हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने; मास्टर माईंड शोधून काढण्याची मागणी

Satara News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने आज सातार्‍यात वातावरण तणावपूर्ण बनले. या घटनेने हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमून घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेल्या फिरोज पठाण यांच्या गोडोली येथील कार्यालयाची अज्ञातांनी तोडफोड केली असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. 

'त्या' मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट इन्स्टाग्रामवरून व्हायरल केल्याचे निदर्शनास आल्याने काही वेळातच वातावरण तापले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमत कार्यालयाच्या दारातच ठाण मांडले. त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत संतप्त होत्या. अशा प्रवृत्तींना ठेचून काढा, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा अशी संतप्त जमावाची मागणी होती. त्यानंतर हा जमाव कार्यालयाबाहेर आला आणि त्यांनी रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या निदर्शनांमुळे वातावरण चांगलेच तापले. या आंदोलकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरणा जास्त असल्याचे पहायला मिळाले.

मास्टर माईंड शोधून काढू

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्या आरोपीचे इन्स्टाग्राम अकौंट अन्य कोणी ऑपरेट करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याला अनुसरून या घटनेची सायबर सेलमार्फत दोनच दिवसात सखोल चौकशी करण्यात येईल व या घटनेचा मास्टर माईंड कोणी असेल तर त्याला शोधून काढण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

घटनेशी आपला काहीही संबंध नाही

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रराजे यांचे कट्टर समर्थक फिरोज पठाण यांचे गोडोली येथील कार्यालय अज्ञातांनी फोडल्याने वातावरण आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तोडफोड करणार्‍यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तथापि, या घटनेशी आपला काहीही संबंध नसून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त असल्याचा निर्वाळा फिरोज पठाण यांनी दिला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या