शासनाकडून पहिल्या टप्प्यात दोन कोटींचा निधी प्राप्त; प्रतिष्ठानची स्थापना
Satara News : ऐतिहासिक सातारा नगरीत आपणा सर्वांचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक नाही याची उणिव भासत होती. याकरिता आम्ही शासनाकडे जरुर तो पाठपुरावा केला तसेच या नियोजित स्मारकाच्या दैनंदिन देखभाल व वज राखण्यासाठी ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान’ या नावाने रितसर नोंदणीकृत संस्था स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संस्थेचे नोंदणीपत्र प्राप्त झाले आहे. याचदरम्यान राज्य शासनाने या स्मारकासाठी पहिला टप्पा म्हणून २ कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि आपणा सर्वांचे जाजल्य स्फूर्तीदायी व्यक्तीमत्व म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांना उभा देश ओळखतो. त्यांचे स्मारक व्हावे यासाठी ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान’ नावाने संस्था आम्ही स्थापन केली. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार हरिष पाटणे यांना उपाध्यक्ष तसेच गोडोलीचे विलासनाना शिंदे यांची सचिव म्हणून सर्वांनुमते नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांचा आग्रह झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्षपद आम्ही स्वीकारले आहे. या संस्थेमध्ये दत्तात्रय बनकर, ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, वसंत लेवे, संजय पाटील, किशोरतात्या शिंदे, संग्राम बर्गे, अमित कुलकर्णी, अभिजीत बारटक्के, ईर्शाद बागवान, सुजित जाधव, सचिन साळुंखे, अमोलभाऊ तांगडे या व्यक्तींचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रतिष्ठानची बैठक लवकरच
छत्रपती संभाजी महाराज यांचा त्यांच्या लौकिकास शोभून दिसेल असा पुतळा आणि स्मारक उभारणी करताना तसेच त्यानंतर त्याची वज राखण्यासाठी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सूचना प्रस्तावित केल्या जाणार आहेत. स्मारकाचे संपूर्ण काम सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी नुकताच २ कोटींचा पहिला टप्यातील निधी नगरपरिषदेस प्राप्त झाला आहे. लवकरच प्रतिष्ठानची बैठक बोलावण्यात येणार आहे. या स्मारकाचा आराखडा, नकाशा तसेच अन्य बाबींविषयी या बैठकीत विचारविमर्श करण्यात येणार असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले आहे.
Swarajyarakshak Chhatrapati Sambhaji Maharaj Smarak In Satara, Chhatrapati Udayanraje Bhosale is President of smarak Pratishthan, Maharashtra Govt. Sanctioned 2 CR For Smarak.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या