Satara News: अखेर 'त्या' तरूणाचा मृतदेह सापडला


ओगलेवाडीच्या तरुणाची आत्महत्या; अथक शोधमोहिमेचा दुःखद क्लायमॅक्स

Satara News : सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या सारोळा येथील पुलावरून उडी टाकून आत्महत्या केलेल्या कराड तालुक्यातील ओगलेवाडीच्या तरुणाचा मृतदेह आज शोध मोहिमेदरम्यान सारोळा पुलापासून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर प्रवाहामध्ये मिळून आला.

नीलेश महादेव काकडे (वय ४०, रा. ओगलेवाडी, ता. कराड, सध्या रा. जाधववाडी, पिंपरी चिंचवड, पुणे) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी नीरा नदीच्या पुलावर आपली दुचाकी लावून त्याने नदीपात्रात उडी घेतली होती. पुलावर मिळालेल्या गाडीवरून संबंधिताने नदीत आत्महत्या केली असावी असा तर्क करून त्यानुसार शोध मोहिमेला गती देण्यात आली होती. 

तब्बल १५ किलोमीटर वाहत गेला

महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँण्ड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर, शिरवळ रेस्क्यू टीम यांच्याकडून गुरुवारी (दि. १०) सकाळी शोधमोहीम सुरु करण्यात आली. आजही सकाळपासून ही शोध मोहीम शर्थीने राबवली जात होती. या मोहिमेत अखेर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुलापासून पुढे जवळपास १५ किलोमीटर अंतरावर राजापूर स्मशानभूमीजवळ नदीच्या प्रवाहात निलेश काकडेचा मृतदेह मिळून आला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे हा मृतदेह इतका लांबवर वाहत गेला होता.

नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला

सकाळपासून ही मोहीम राबवली जात असताना त्याचे नातेवाईकही उपस्थित होते. दुःख, अस्वस्थता आणि खिन्नतेने ते हताश झाले होते. मृतदेह मिळून आल्यानंतर मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. शिरवळ पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मयत म्हणून नोंद झाली असून पुढील तपासासाठी हे प्रकरण राजगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

Neera rever Sarola bridge, suicide in river, Shirwal Rescue Team, Mahabaleshwar Trekkers, Pratapgad search & Rescue Team

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या