अॅड. नितीन शिंगटे व जितेंद्र शिंगटे यांचे पितृछत्र हरपले; सोमवारी रक्षाविसर्जन
Satara News : साताऱ्यातील गोडोली, विलासपूर येथील निवृत्त तहसीलदार साहेबराव सीताराम शिंगटे (वय ८३) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.
साहेबराव शिंगटे हे अखिल भारतीय अधिवक्ता परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेक्रेटरी अॅड. नितीन शिंगटे व दै. ‘पुढारी’ चे जाहिरात प्रतिनिधी जितेंद्र शिंगटे यांचे वडील, तर भाजपच्या माजी आमदार डॉ. कांताताई नलावडे यांचे ते मामा होत. त्यांनी महाबळेश्वर, खटाव व जावली येथे तहसीलदार म्हणून काम केले आहे.
सोमवारी संगम माहुलीत रक्षाविसर्जन
साहेबराव शिंगटे यांच्या पार्थिवावर आज दुपारी संगम माहुली (सातारा) येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा रक्षा विसर्जन विधी सोमवारी (दि. १४) संगम माहुली येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे.
Retired taluka magistrate of Mahabaleshwar, khatav and jawali, father of Ad. Nitin Shingate
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या