साताऱ्यात बनला 'क्रॅंक शाफ्ट'; कृतीतून सिद्ध केले 'कूपर सबसे ऊपर'
Satara News : अखंड विश्वाचे लक्ष वेधून घेतलेली हिंदुस्थानची 'चांद्रयान ३' मोहीम बुधवारी फत्ते झाली. तमाम देशवासियांसाठी अभिमानास्पद असलेल्या या मोहिमेत साताऱ्यातील कूपर उद्योग समूहाचाही वाटा असल्याचे समोर आले आहे. याचा कूपर उद्योग समूह व्यवस्थापन, कामगार व सर्व सातारकरांना अभिमान आहे.
ही सर्व मोहीम हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो अंतर्गत यशस्वी करण्यात आली. इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स हे एक इस्रोचे द्रव प्रणोदन प्रणालीतील अत्यंत महत्वाचे केंद्र आहे, ज्यामध्ये शुद्ध हायट्रोजन गॅसची आवश्यकता असते. या हायट्रोजन गॅसचा पुरवठा करत असलेली मे. आंध्र शुगर्स लिमिटेड (सागगोंडा) या कंपनीला या हायट्रोजन गॅसच्या उत्पादनासाठी ३ कटिंग एज स्टॅण्डेड हाय प्रेशर कॉम्प्रेसरची आवश्यकता लागते. हे ३ कटिंग एज स्टॅण्डेड हाय- प्रेशर कॉम्प्रेसर मशिन पुण्यातील मे. वर्कहार्ट कॉम्प्रेशन इंडिया यांनी पुरवले. या मशिनमध्ये लागणारा 'क्रॅंक शाफ्ट' कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. यांनी पुरविलेला आहे.
'कूपर सबसे ऊपर' सिध्द केले
कूपर उद्योग समूह ही सातारकरांची अस्मिता आहे. त्यामुळे 'कूपर सबसे ऊपर' असे कूपरच्या बाबतीत म्हटले जाते. देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरलेल्या चांद्रयान ३ मोहिमेत अशा पद्धतीने आपले योगदान देत कूपरने 'कूपर सबसे ऊपर' हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले. त्यामुळे सातारकरांकडून कूपर समूहाचे कौतुक होत आहे.
Chandrayan 3, successful mission of ISRO, successful landing of chandrayan 3 on moon, India is the first country in the world, which achieve landing on South pole of moon, Cooper corporation private limited Satara is contributed in mission chandrayan 3
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या