राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत १६ पदकांची लयलुट; शिवेंद्रराजेंकडून कौतुक
सातारा : राष्ट्रीय पातळीवरील तलवारबाजी क्रीडा प्रकारात विविध गटातील स्पर्धांमध्ये सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण १६ पदके पटकावली.
राष्ट्रीय पातळीवरील सब जुनियर, जुनियर, सिनियर, खेलो इंडिया, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी या झालेल्या स्पर्धांमध्ये तलवारबाजीमध्ये सातारा फेन्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी १६ पदके मिळवली. यामध्ये सृष्टी जाधव, भूषण वरकटे, आर्या पोळ, नूतन वरकटे, अनन्या वरकटे, प्रसाद सणस, साहिल गुर्जर, रोहन पवार, प्रणव पोळ, वेदराज कुंकले, ऋतुराज कुंकले, आदिती वाघमारे, रिद्धी फणसे, योगिता मुंगसे, स्वराली वरकटे, अथर्व वरकटे, कार्तिक वरकटे, शंभूराज फणसे, विघ्नेश जाधव, सुशांत सोनावणे, पियुष केकटे, सखाराम पांढरे, वरद साळी, विरजा साळी या खेळाडूंचा समावेश आहे.
शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून सत्कार
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या खेळाडूंचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सातार्यातील खेळाडूंनी तलवारबाजीत दबदबा निर्माण केला असून त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. यावेळी खेळाडूंचे प्रशिक्षक प्रफुल्ल जगताप, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
National Sports News, MLA Shivendrasinhraje Bhosale, 16 Medales in Fencing to Satara
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या