कराड वन विभागाची शनिवारी रात्री कारवाई; एकजण ताब्यात
Wildlife News : वनविभागाच्या कराड कार्यालयाच्या पथकाने शनिवारी (दि. ५) रात्री ९ वाजता शेणोली स्टेशन येथील संजयनगर - गोपाळनगर येथे कारवाई करीत एकास घोरपड शिकार प्रकरणी ताब्यात घेतले. सुनील विजय जाधव (रा. गोपाळनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
या आरोपीने घोरपडीची शिकार केली असल्याची तसेच ही घोरपड स्वतःच्या घरी घेऊन जाऊन शिजवून त्याचे मटण केले असल्याची गोपनीय माहिती मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो सदस्य रोहन भाटे यांना सायंकाळी मिळाली. त्यांनी ती माहिती तात्काळ वनक्षेत्रपाल तुषार नवले यांना दिली.
पथकाकडून रातोरात कारवाई
वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक कैलास सानप, शंकर राठोड, मानसी निकम, पूजा परुले, वाहन चालक योगेश बडेकर, वनसेवक भरत पवार, अमोल माने यांच्या पथकाने शिताफीने शेणोली स्टेशन येथे रात्री कारवाई करीत आरोपीस ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरा गुन्हा नोंद करणे व अटक प्रक्रिया सुरू होती.
७ वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद
घोरपड हे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत शेड्यूल १ भाग १ मध्ये येते. त्याची शिकार करणे, हाताळणे कायद्याने प्रतिबंधित आहे. या गुन्ह्यासाठी ७ वर्षापर्यंत कारावास व दहा हजारपर्यंत शिक्षेची कायद्यात तरतूद आहे.
Hunting of Monitor lizard ( Ghorpada ) near Karad (Dist. Satara), Action under wildlife protection act 1972
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या