कराडच्या सर्पमित्रांनी सुरक्षितपणे बाहेर काढले; वनविभागाने सोडले अधिवासात
Wildlife News : कोकणातून आलेल्या व कराडजवळील शिवराज धाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या प्रवाशांच्या कारच्या बोनेटमध्ये भला मोठा अजगर आढळल्याने प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. तथापि, सर्पमित्रांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून अजगराला सुरक्षितपणे बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्या अजगराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली.
याबाबतचे वृत्त असे, बुधवारी रात्री रत्नागिरीहून कारने कराडकडे आलेले प्रवासी पाटण तिकाटण्यापासून जवळ असलेल्या शिवराज धाब्यावर जेवायला थांबले होते. यादरम्यान कारचालकाने गाडीचे बोनेट उघडले असता त्यात त्याला एक अजगर ठाण मांडून बसलेला दिसला. ते पाहून त्याच्यासह सहप्रवाशांचीही भीतीने गाळण उडाली. त्यानंतर तेथील लोकांच्या माहितीवरून सर्पमित्रांना बोलावण्यात आले.
नैसर्गिक अध्घ्विासात केले मुक्त
सर्पमित्र उदित कांबळे, अजय महाडिक, रोहित कुलकर्णी यांनी अजगराला सुरक्षितपणे गाडीमधून काढले व वनविभागाच्या ताब्यात दिले. आज वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक बजरंग वडत्कर, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे तसेच सर्पमित्र उदित कांबळे, अजय महाडिक, रोहित कुलकर्णी यांनी अजगराला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
Wildlife News In Karad, Python in Car, Forest Department Karad
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या