शिवरायांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणार्याची समोर आलेली रहस्यकथा
Satara Crime News : आपल्या मैत्रिणीशी चॅटिंग करणार्या मुलाला अद्दल घडावी, जनक्षोभाचा लोळ त्याच्यावर पडावा या उद्देशाने त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याची कबुली याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीने दिली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी १५ ऑगस्ट रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ज्या विधीसंघर्ष मुलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ती पोस्ट व्हायरल झाली होती, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतरही त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट कोणीतरी ऑपरेट करत असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीने जोर धरला होता.
कनेक्शन तोडण्यासाठी उपद्व्याप
या सखोल तपासातूनच नवी रहस्यकथा उलगडली आहे. या विधीसंघर्ष मुलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या नकळत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणार्या आरोपीला सातारा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून जेरबंद केले आहे. त्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे.
हा संशयित आरोपी त्याच्या मैत्रिणीसोबत इन्स्टाग्रामवर चॅटिंग करायचा. त्याचवेळी ती मैत्रीण आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आधी ताब्यात घेतल्या गेलेल्या अल्पवयीन मुलाशीही चॅटिंग करायची. ते संशयित आरोपीला आवडत नव्हते. त्याच रागातून त्या दोघांचे कनेक्शन तुटावे, त्याचबरोबर त्या मुलाची बदनामी व्हावी, त्याला अद्दल घडावी यासाठी हे सगळे उपद्व्याप केल्याचे त्याने सांगितले अशी माहिती त्यांनी दिली.
आयडी व पासवर्ड दिला आणि...
सुरुवातीला संशयित आरोपीने 'आरोही' अशा स्त्रीदर्शक नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले. त्यावरून त्या अल्पवयीन मुलाशी त्याने चॅटिंग सुरू केले. यातून हळूहळू त्या मुलाचा विश्वास संपादन करत एक दिवस त्याने हळूच मुलाकडून त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा आयडी व पासवर्ड मिळवला. इथेच हा मुलगा फसला व त्याच्या अकाउंटची सूत्रे संशयित आरोपीकडे गेली. मग त्याने या मुलाला पुरता अडचणीत आणण्यासाठी त्याच्या अकाउंटवरून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली.
Chhatrapati Shivaji Maharaj, Cyber Crime, IPS Sameer Shaikh, Satara
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या