Satara News : माण तालुक्यात लाचखोर तलाठी सापळ्यात


न्यायालयाचा आदेश असताना नोंद लावण्यासाठी मागितली लाच

Satara ACB News : न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरफारला जमिनीची नोंद करायची असताना त्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माण तालुक्यातील शेनवडीच्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तुकाराम शामराव नरळे (वय ३६, रा. पानवन, ता. माण) असे या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या चुलत सासऱ्याच्या शेनवडी येथील साडेतेरा एकर जमिनीबाबत म्हसवड न्यायालयात दावा सुरू होता. त्याचा निकाल होऊन ही जमीन तक्रारदार यांचे पती व दीर यांच्या नावे करण्याचा आदेश झाला. त्याप्रमाणे फेरफार ला नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी तुकाराम नरळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कामासाठी अकरा हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ९ हजार रुपये देण्याचे ठरले.

म्हसवडमध्ये रंगेहात पकडले

यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर शुक्रवारी या विभागाच्या पथकाने सापळा लावला. म्हसवड येथील ढोर कारखान्यासमोर तलाठी नरळे यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य, पोलीस नाईक निलेश चव्हाण, प्रशांत नलावडे मारुती अडागळे, पोलीस शिपाई तुषार भोसले यांनी सहभाग घेतला होता. 

लाच मागितल्यास संपर्क साधा

कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उज्ज्वल वैद्य यांनी केले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा 

मोबाईल क्र. 9823231244

कार्यालय क्र. 02162-238139

ईमेल dyspacbsatara@gmail.com , dyspacbsatara@mahapolice.gov.in

टोल फ्री क्र. 1064

Anti Corruption Bureau Satara, Revenue dept.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या