Satara News : जेल फोडण्याच्या घटनेला ७९ वर्षे पूर्ण


सातारा जेलसमोर शौर्य दिन साजरा; स्वराज्याचे सुराज्य निर्माण करा - नायकवडी

Satara News : क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जेल फोडून जो इतिहास निर्माण केलेला आहे, त्या इतिहासाला सातत्याने समोर ठेवून त्यापासून प्रेरणा घेऊन मिळालेल्या स्वातंत्र्याचे सुराज्य निर्माण करण्याचे काम तरुण पिढीने केले पाहिजे. यासाठीच आजचा शौर्य दिन साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन हुतात्मा उद्योग समूहाचे वैभवकाका नायकवडी यांनी सातारा येथे केले.‌

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी सातारा जेल फोडून दि. १० सप्टेंबर १९४४ रोजी बाहेर पडले. या घटनेला ७९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाबाहेर स्वातंत्र्य चळवळीत बंदिवान असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या स्मृती स्तंभास अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी वैभवकाका नायकवडी बोलत होते. यावेळी शिराळा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब नायकवडी, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विजय मांडके, सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, वीरधवल नायकवडी, केदार नायकवडी, भगवान पाटील आदी उपस्थित होते. 

सर्वांच्या साथीने काम करणे गरजेचे

स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या पद्धतीने सर्वधर्मीयांना बरोबर घेऊन स्वातंत्र्य चळवळीत काम केले जायचे, त्याच पद्धतीने यापुढच्या काळात सर्वांना बरोबर घेऊन कष्टकरी, शेतकरी, महिला, दलितांच्या राज्यासाठी काम करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विजय मांडके यांनी यावेळी केले. 

घोषणांनी परिसर दुमदुमला

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा विजय असो, स्वातंत्र्यसैनिकांचा विजय असो, हुतात्मा किसन अहिर व हुतात्मा नानकसिंग यांचा विजय असो आदी घोषणांनी हा परिसर यावेळी दुमदुमून गेला होता.

यावेळी दिनकर बाबर, विठ्ठल गुंजवटे, बाळासाहेब पाटील, प्रा. डॉ. भास्कर कदम, अस्लम तडसरकर,  प्रा. दत्ताजीराव जाधव, विजय निकम, गणेश कारंडे, बजरंग देसाई, त्र्यंबक ननावरे, प्रा. आनंद साठे, गौतम भोसले, उदय चव्हाण, प्रकाश खटावकर, बजरंग देसाई, प्रमोद परामणे, शंकर पाटील, डॉ. दीपक माने, प्रा. डॉ. विजय माने, शुभम ढाले, रोहित क्षीरसागर आदी उपस्थित होते. गणेश दुबळे यांनी आभार मानले.

Krantiveer Nagnathanna Naykawadi, Satara jail, freedom movement of India 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या