Satara News : पुसेसावळी दंगलप्रकरणी सर्वधर्मीयांचा टाहो


सूत्रधाराला अटक करा; अन्यथा गांधी जयंतीदिनी काढणार शांतता मोर्चा

Satara News : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे झालेल्या दंगलप्रकरणी आज शेकडो या कटाच्या सूत्रधाराला दोन ऑक्टोबरपर्यंत अटक न केल्यास गांधी जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वधर्मीय सर्वपक्षीय बंधू-भगिनींचा शांतता मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

गणेशोत्सव व ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर आज सातारा येथे शांतता फेरी आयोजित केली होती. परंतु ती पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन स्थगित करण्यात आली. परंतु मागण्यांचे निवेदन देण्यासाठी प्रतिनिधी मंडळ जिल्हाधिकारी कार्यालयावर जमले होते. यावेळी न बोलवता किंवा कोणतेही आवाहन न करता सर्वधर्मीय तरुण शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. त्यांना शांत करून प्रमुख शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. हे निवेदन सातारचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी स्वीकारले.

सत्यशोधन समिती नेमून चौकशी करा

या निवेदनात म्हटले आहे, की सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दि. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात नूर हसन शिकलगार या निरपराध व्यक्तीचा बळी गेला, तर अनेक लोक जखमी झाले आहेत. अद्यापही काहीजण कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन मशिदी जाळण्याचा प्रयत्न झाला. मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. वाहने पेटवण्यात आली. मुस्लिम समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. 

या प्रकरणाची सर्वसमावेशक सत्यशोधन समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अल्पसंख्याक समाजाविषयी सतत द्वेषपूर्ण, प्रक्षोभक आणि गैरसमज निर्माण करणारी वक्तव्ये करून मुस्लिम समाजाविरोधात भडकावू वातावरण तयार करणारा सूत्रधार विक्रम पावसकर याला तातडीने अटक करण्यात यावी, या हिंसाचारात बळी पडलेल्या निरपराध नवविवाहित तरुणाच्या कुटुंबास तातडीने २५ लाख रुपये इतकी  नुकसानभरपाई मिळावी, झालेले पंचनामे व जबाब  दबावाच्या वातावरणात झालेले असल्याने आम्हाला मान्य नाहीत, हे सर्व फेरपंचनामे करून  सर्व पीडितांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, मागील सहा महिन्यात सातारा जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट केल्याचे निमित्त होऊन हल्ला झालेल्या सर्व घटनांची पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एकत्रित चौकशी करून त्यामागच्या षड्यंत्राचा शोध घ्यावा अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

शिष्टमंडळात मान्यवरांचा समावेश 

निवेदन देताना शिष्टमंडळामध्ये मिनाज सय्यद, विजय मांडके, रजनी पवार, अमजदभाई, ॲड. वर्षा देशपांडे, नरेंद्र पाटील, जमीर शेख, इम्रान शेख, सलीम खान, जुनैद शेख, गणेश भिसे, गुफरान शेख, ॲड. शैलजा जाधव, कॉ. सलीम अत्तार, उमेश खंडुजोडे, चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, कैलास जाधव, डॉ. दत्ताजीराव जाधव,  आरिफ शेख, अविनाश जगताप, कॉ. माणिक अवघडे, कॉ. वसंत नलवडे, असलम तडसरकर इत्यादी उपस्थित होते. 

Pusesawali issue, Satara district 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या