Satara News : गौरी सजावटीतही 'बाईपण भारी देवा'


मसूरमध्ये नारीशक्तीचा जागर; देखाव्यातून महिला सबलीकरणाचा संदेश

Satara News : सार्वजनिक गणेशोत्सवांप्रमाणेच घरगुती गणेशोत्सव आणि गौरीच्या सजावटीमध्ये समाजातील घटना घडामोडींचे प्रतिबिंब उमटलेले पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवात बहुतांश ठिकाणी चांद्रयान मोहिमेचा प्रभाव दिसत आहे. त्याचवेळी गौरी सजावटीत मसूरमध्ये 'बाईपण भारी देवा' चा फिवर पाहायला मिळत आहे.

कराड तालुक्यातील मसूर येथील सारिका गजानन चेणगे यांनी आपल्या घरी केलेल्या गौरी सजावटीत 'बाईपण भारी देवा' या सुपरहिट चित्रपटाच्या धर्तीवर आधुनिक काळातील गौराई साकारली आहे. सारिका चेणगे, कादंबरी शहा, श्रद्धा शहा, रश्मी शहा यांनी मिळून केलेला हा देखावा पाहायला महिलांची गर्दी झाली आणि या देखाव्याचे कौतुकही झाले. 


या देखाव्यातून नारी शक्तीचा जागर केला असून महिला सबलीकरणाचा अनोखा संदेश यातून दिला आहे.

Voice of nari Shakti, womens empowerment, Gauri utsav in Masur

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या