Satara News : आहंच्या ग्रंथतुलेतील ग्रंथांचे रविवारी वितरण


साधना साहित्यिक व सांस्कृतिक मंचतर्फे ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजन
Satara News : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या ग्रंथतुलेच्या ग्रंथ वितरणाचा सोहळा रविवार, दि. १० सप्टेंबर रोजी सातारा येथे होणार आहे. यावेळी डॉ. साळुंखे लिखित ग्रंथांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. साधना साहित्यिक व सांस्कृतिक मंच (सातारा) यांनी हा सोहळा आयोजित केला असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष, गझलकार वसंत शिंदे यांनी दिली.
भारतीय समाजाला आपल्या लेखणीच्या आणि वाणीच्या माध्यमातून सामाजिक, सांंस्कृतिक दिशा देण्याचे मूलभूत स्वरुपाचे कार्य डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आयुष्यभर केले आहे. त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम होत आहेत. सातारा या त्यांच्या कर्मभूमीत शानदार सोहळा व्हावा आणि ग्रंथाचे भव्य स्वरुपात वितरण करावे हा उद्देश ठेवून हा सोहळा होत आहे.
आहंचे विचार ऐकण्याची संधी
कार्यक्रमास अभिनेते सयाजी शिंदे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून अध्यक्षस्थान संभाजीराव पाटणे भूषविणार आहेत. या सोहळ्यात डॉ. आ. ह. साळुंखे यांचे विचार ऐकण्याची संधी सातारकरांना मिळणार आहे. 
उपस्थित राहण्याचे ग्रंथप्रेमींना आवाहन
हा कार्यक्रम कन्या शाळेच्या पाठीमागील दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता होणार असून जास्तीतजास्त नागरिक व ग्रंथप्रेमींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन कवी वसंत शिंदे तसेच साधना मंच व आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Dr. A. H. Salunkhe, Wellknown Film star Sayaji Shinde, Principal Dr. Yashwant patne 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या