जयंतीनिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम; 'शेवरोले' लक्ष वेधून घेणार
Satara News : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्था आणि संस्थेच्या सातारा शहर परिसरातील स्थानिक शाखांच्या वतीने शुक्रवारी (दि. २२) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी दिली.
दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता संस्थेचे सर्व पदाधिकारी, सेवक, विद्यार्थी यांच्यावतीने कर्मवीर समाधीस अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शेवरोले या गाडीसह कर्मवीरांच्या तैलचित्रासह शहरातून चित्ररथ काढण्यात येणार असून त्यामध्ये विद्यार्थी व रयत सेवक सहभागी होणार आहेत. यावेळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव बी. एन. पवार, ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे हे पुष्पहार घालून अभिवादन करणार आहेत.
समाधी परिसरात मुख्य कार्यक्रम
कर्मवीर जयंतीचा मुख्य कार्यक्रम सकाळी ११ वाजता कर्मवीर समाधी परिसरात आयोजित केला आहे. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने दि रयत सेवक को-ऑप बँकेच्या वतीने दुपारी ३ वाजता भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींच्या हस्ते आर्यांग्ल हॉस्पिटल, अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे व गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात येणार आहेत.
रक्तदान शिबिराचे आयोजन
रयत सेवक को-ऑप बँकेचे कर्मचारी शाहूबोर्डिंग शाखा नं. १ व २, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील वसतीगृहातील विद्यार्थिनीना फळे वाटप करणार आहेत.शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सर्वच उपक्रमांना सातारा शहरातील शिक्षणप्रेमी, सातारकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विकास देशमुख यांनी केले आहे.
Rayat Shikshan Sanstha, Secretary IAS Vikas Deshmukh, Karmveer Bhaurao Patil birth anniversary, 22 September
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या