वाई ते सातारा पायी मोर्चात जनतेतील उद्विग्नतेचे दर्शन; सर्व समाजघटक एकवटले
Satara News : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरील अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज वाईहून सातारच्या दिशेने पायी निघालेला मोर्चा दुपारी पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड येथे पोलिसांनी अडवला. त्यामुळे मोर्चेकरी आक्रमक झाले. त्या ठिकाणी शासनाला निवेदन देऊन हा मोर्चा स्थगित करण्यात आला.
लाठीहल्ल्यामुळे समाजमन उद्विग्न झाले असून जनतेतील या धगीची शासनाला जाणीव करून देण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने आज वाई ते सातारा असा ३२ किलोमीटरचा पायी मोर्चा काढण्यात आला होता. तत्पूर्वी रायरेश्वराहून आणण्यात आलेल्या मराठा क्रांती मशालीचे वाईत महागणपती घाटावर आगमन झाले. या मशालीचे पूजन व महाआरती झाल्यानंतर हा पायी मोर्चा सातारच्या दिशेने मार्गस्थ झाला.
सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार
मोर्चात मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकार्यांसह प्रचंड जनसमुदाय भगवे झेंडे, भगव्या टोप्या व उपरणी घालून सहभागी झाला होता. त्यात महिलांचा सहभागही लक्षणीय होता. सर्व समाजाचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. अग्रभागी एका वाहनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. आंदोलकांकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा लाख मराठा’, सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार असो’ अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.
मोर्चा अडवल्यामुळे आंदोलक आक्रमक
वाईपासून साधारणत: १२ किलोमीटरचे अंतर पार करत मोर्चा पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड (ता. वाई) येथे पोहोचला, तेव्हा पोलिसांनी मोर्चा अडवला. ‘तुम्हाला वाई ते पाचवडपर्यंतच परवानगी देण्यात आली असल्याने पुढे जाता येणार नाही’ असे पोलिसांनी आंदोलकांना सांगितल्यावर आंदोलक व पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. आम्ही सातारला जाऊन जिल्हाधिकार्यांना निवेदन देणारच अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तथापि, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी मोर्चा समन्वयकांशी चर्चा करून मध्यममार्ग काढला. युवक युवतींच्या हस्ते निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला. मोर्चासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Maratha Kranti Morcha, Wai To Satara Long March
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या