रविवारी शिवदीक्षा विधी; महाप्रसादाने होणार अनुष्ठानाची सांगता
Satara News : सातारा येथील ५०१ पाटीजवळील औंधकर मठात श्रीगुरु गंगाधर शिवाचार्य महाराज (बार्शी मठ) यांच्या सानिध्यात मंगळवारी श्रावणमास अनुष्ठानाचा शुभारंभ झाला. या अनुष्ठानाची सांगता रविवारी (दि. १०) होणार असून त्या दिवशी शिवदीक्षा विधीही होणार आहे.
वीरशैव लिंगायत समाज, वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, वीरशैव महिला भजनी मंडळ तसेच महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ यांच्या सहयोगातून या पाच दिवसीय अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुष्ठानात दररोज सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत गुरुमहाराजांची इष्टलिंग पूजा, बिल्वार्चन, मंगलआरती, आशीर्वचन, सायंकाळी पाच ते सहा शिवपाठ, सहा ते सात श्रीगुरूंचे आशीर्वचन असे नित्य कार्यक्रम आहेत.
नित्य लिंगपूजा व शिवदीक्षासाठी...
रविवारी सकाळी नऊ वाजता शिवदीक्षा विधी, मंगलआरती होणार असून त्यानंतर महाप्रसादाने या अनुष्ठानाची सांगता होणार आहे. या अनुष्ठानात नित्य लिंगपूजेसाठी बसणारे दाम्पत्य व शिवदीक्षा विधीसाठी महेश स्वामी (मो. ९८२२९१८५८६), महेंद्र बाजारे (मो. ९४२२६०८५८६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या