माध्यम संवाद परिषदेत राहुल सोलापूरकर यांनी मांडले परखड विचार
Satara News : बातमीचा वाचकावर, समाज मनावर काय परिणाम होणार याचा विचार करून त्या दिल्या गेल्या पाहिजेत. जेव्हा राष्ट्र म्हणून प्रश्न येतो, तेव्हा माध्यमांनी राष्ट्र प्रथम ही भूमिका घेऊन जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी येथे केले.
विश्व संवाद केंद्र (पुणे) व सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माध्यम संवाद परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. 'माध्यमांची ताकद आणि माध्यमांचा गैरवापर' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय जोशी, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, नितीन देशपांडे, नगर वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशाभिमान कृतीतूनही प्रकट व्हावा
देशाविषयीचा अभिमान फक्त शब्दांमधून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त व्हायला हवा. पूर्वी जगाच्या पाठीवर कुठेही हस्तांदोलनासाठी हात पुढे करणारी माणसे आता हात जोडायला लागली आहेत. हा बदल कोणापासून अगदी ठळकपणे दिसू लागला आहे असे सांगून सोलापूरकर म्हणाले, आपल्याच भाषेवर आपण जोपर्यंत प्रेम करणार नाही, तोपर्यंत भाषेत अचूकता येणार नाही. त्या त्या भाषेचा एक लहेजा असतो. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे त्याची जाणीव ठेवली जात नाही.
पुरावा शोधणे ही माध्यमांची जबाबदारी
विचारधारा कोणतीही असो, राष्ट्र महत्त्वाचे मानले पाहिजे. बातम्यांच्या संदर्भात पुरावा शोधणे ही माध्यमांची जबाबदारी आहे. माध्यमे वर्गणीदारांवर चालत नाहीत, तर जाहिरातींवर चालतात हे खरे असले तरी केवळ धंदा व खप यासाठी मार्केटिंग स्किल यामध्ये आपण अडकलो आहोत काय याचा विचार करण्याची गरज आहे, असेही सोलापूरकर म्हणाले.
प्रारंभी अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संपदा देशपांडे व वैदेही कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अनंतराव जोशी यांनी आभार मानले.
Vishva samvad Kendra (Pune) and shrimant Chhatrapati Pratap Singh Maharaj Nagar vachnalay (Satara), madhyam samvad Parishad, Rahul Solapurkar
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या