Wildlife News : कराडमध्ये सापडले दुर्मिळ स्टार कासव


आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा गुन्हा मानला जात असताना दु:साहस केले कोणी ?

Satara News : वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षित प्राणी असलेले आणि देशात सर्वाधिक तस्करी होणारे स्टार कासव कराड शहरात बेवारस स्थितीत सापडले आहे. स्टार कासव पाळणे, बाळगणे किंवा त्याची विक्री करणे हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. असे असताना कराडमध्ये हे दु:साहस कोणी केले ? याचा शोध घेतला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतातील अत्यंत दुर्मिळ प्रजाती असलेले हे स्टार कासव मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना शनिवारी (दि. १६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कराडमधील रविवार पेठेतील काझी वाडा परिसरात बेवारस स्थितीत सापडले आहे. हे कासव जाणून बुजून कोणाकडून तरी सोडण्यात आले असून याबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

नैसर्गिक अधिवासात लवकरच पुनर्वसन

कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनरक्षक कैलास सानप यांनी हे कासव ताब्यात घेतले असून सातारा विभागाच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या स्टार कासवाचे त्याच्या नैसर्गिक अधिवासात लवकरच पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या