समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय; निवडून आणण्याचा निर्धार
Karad News : सध्या पाडळी (केसे) गावचे सुपुत्र आणि बहुजनांचा आवाज असलेल्या विश्वास मोहिते यांनी जिल्हा परिषदेच्या तांबवे गटातून किंवा पंचायत समितीच्या सुपने गणातून उमेदवारी करणार असल्याचे घोषित केले आहे. सुदैवाने गटात किंवा गणात आरक्षण हे अनुसूचित जातीचे राहिल्यास आम्ही बहुमताने निवडून आणणार असा निर्णय या विभागातील समविचारी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला.
तांबवे जिल्हा परिषद मतदार संघातील एका गावात पार पडलेल्या गोपनीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्वसामान्य लोकांसाठी शासकीय योजना मिळविताना आलेल्या अडचणीच्या ठिकाणी धावून जाणे, विद्यार्थी प्रवेशावेळी मदत करणे, विधवा परित्यक्ता भगिनींना मदत करणे, विभागात विधायक विकासकामे सुरु असताना त्याचा दर्जा कसा राहील यासाठी पाठपुरावा करणे अशा विविध ठिकाणी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून विश्वास मोहिते यांच्याकडे पाहिले जाते.
पक्ष कोणताही असो; निवडून आणणार
अशा निर्भीड व निस्वार्थी व्यक्तींच्या हातात सत्ता किंवा सत्तेच्या चाव्या असणे गरजेचे आहे. त्यामुळे विश्वास मोहिते यांच्या समाजकार्यांची दखल घेऊन त्यांनी कोणत्याही पक्षातून निवडणूक लढविल्यास आम्ही त्यांना सर्व प्रकारे ताकद देऊन भरघोस मतांनी निवडून आणणार असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पाडळी, केसे, म्होप्रेसह जिल्हा परिषद गटातील विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Satara ZP Election, Vishwas Mohite candidate
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या