सातारा, माढ्यात झंझावात; विजय निश्चय मेळाव्यांचे आयोजन
Satara News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील सोमवारी (दि. ५) सातारा जिल्ह्यात येत असून सोमवारी व मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यामध्ये सातारा लोकसभा मतदार संघातील ४ विधानसभा मतदार संघात व माढा लोकसभा मतदार संघातील एका विधानसभा मतदार संघात त्यांच्या उपस्थितीत विजय निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता पाटणमधील कार्यकर्त्यांचा विजय निश्चय मेळावा पाटण येथे होणार आहे. तसेच कराड उत्तर व दक्षिणमधील कार्यकर्त्यांचा विजय निश्चय मेळावा दुपारी २ वाजता उंब्रज येथे आरण्या मंगल कार्यालयात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता कोरेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांचा विजय निश्चय मेळावा मार्केट यार्ड, कोरेगाव येथील गीताई मंगल कार्यालयात होणार आहे. त्यानंतर त्यांचा मुक्काम सातारा येथे असून दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी १० वाजता माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा विजय निश्चय मेळावा दहिवडी येथे होणार आहे. तद्नंतर माळशिरसकडे जाणार आहेत.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन
जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेळाव्यांसाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या