Satara News : अभयसिंहराजे यांचा पुण्यस्मरणदिन


सातारा तालुक्यात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

Satara News : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांचा रविवार दि. ४ रोजी २० वा पुण्यस्मरण दिन आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी ९ वाजता शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत कणसे ढाब्याजवळ कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार येथे जातिवंत खिलार जनावरांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. 

विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम 

याशिवाय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रक्तदान शिबीर आणि अभिवादन कार्यक्रम होणार आहे. तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायत आदी ठिकाणी अभिवादन कार्यक्रम होणार आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या