Satara News : जयंत राऊत यांचे निधन


राजवाड्यासमोरील न्यू आराम हॉटेलचे मालक जयंत राऊत यांची एक्झिट

Satara News : सातारा येथील प्रतापगंज पेठेतील रहिवासी, राजवाड्यासमोरील न्यू आराम हॉटेलचे मालक, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते जयंत बळीराम राऊत (वय ६१) यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

जयंत राऊत हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्यांचा लोकसंग्रह खूप मोठा होता. प्रेमळ व मनमिळाऊ स्वभाव तसेच इतरांना मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्याविषयी सर्वांना आदर वाटायचा. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची शुद्ध हरपली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार 

त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले आणि त्यांच्या 'हिराई' निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. शनिवारी सकाळी दहा वाजता संगम माहुली (सातारा) येथे कैलास स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या