अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने उदयनराजेंकडून कटुता संपवण्याचा प्रयत्न
गजानन चेणगे
Satara News : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील शीतयुद्ध पाहणाऱ्या सातारकरांना आज उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त झप्पी आणि पप्पी देत सुखद धक्का दिला. उदयनराजेंनी अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने कटुता संपवण्याचा केलेला प्रयत्न आज चर्चेचा विषय ठरला.
खासदार उदयनराजे भोसले हे काही ना काही निमित्ताने आपले धक्कातंत्र दाखवून देत असतात. आज अशाच धक्कातंत्राचा अनुभव सातारकरांना आला. आज आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध वर्तमानपत्रांमध्ये शुभेच्छांच्या जाहिराती झळकल्या. या जाहिरातींमध्ये उदयनराजे गटाकडून दिल्या गेलेल्या जाहिरातींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या धक्क्याची चर्चा सुरू असतानाच उदयनराजे थेट शिवेंद्रराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सुरुची निवासस्थानी पोहोचले.
स्वतः उदयनराजे अभिष्टचिंतन करण्यासाठी सुरुचीवर आल्याचे पाहून वातावरण आरपार बदलून गेले. दोन्ही गटातील कटूता गळून पडली आणि वातावरण हलकेफुलके झालेले दिसले.
शुभेच्छा दिलसे; चुकांबद्दल दिलगिरी
दोन्ही राजे समोरासमोर येताच उदयनराजे यांनी त्यांचा 'बर्थडे बॉय' असा उल्लेख केल्याने या हलक्याफुलक्या वातावरणात हास्याचे कारंजे उडाले. यावेळी पत्रकारांनी शिवेंद्रराजे यांना काय आशीर्वाद द्याल असे विचारले असता, उदयनराजे यांनी आजवर आपणाकडून काही चुकले असल्यास दिलगिरी व्यक्त करतो असे सांगून, शिवेंद्रराजे यांनी फार मोठे व्हावे, त्यांनी जिल्ह्याचे - महाराष्ट्राचे पाहावे. त्यासाठी जे काही करावे लागेल ते मी करणार अशी ग्वाही उदयनराजे यांनी दिली. यावेळी त्यांनी शिवेंद्रराजे यांच्या पायात आपल्याला काकींचा मार खावा लागल्याचे सांगत बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला.
शिवेंद्रराजे यांना झप्पी आणि पप्पी !
वाढदिवसानिमित्त शिवेंद्रराजे यांचे अभिष्टचिंतन करायला आलेल्या उदयनराजे यांनी त्यांना दिलेल्या झप्पी आणि पप्पीमुळे त्यांच्यातील कटूता कमी झाल्याचे पाहायला मिळाले. शिवेंद्रराजे यांनीही यावेळी उदयनराजे यांच्याविषयी बोलताना त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीत वरून लवकर काय तो निर्णय व्हावा, म्हणजे लवकर कामाला लागता येईल. याबाबतीत अजून तळ्यात मळ्यात सुरू असल्याने त्यांचे नेमके काय चालले आहे मला कळत नाही. उदयनराजे यांनी लवकर दिल्लीतून शिक्कामोर्तब करून घ्यावे. म्हणजे त्यांच्याबरोबर प्रचार करायला आम्ही तयार आहोत असे भाष्य केले.
Udayanraje Bhosle, member of rajya sabha, Shivendraraje Bhosle, BJP, Union Home minister Amit Shah
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या