Masur News : कराड तालुक्यातील मसूर येथील मुलींच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी शाळेतील मुलींनी मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या गीतांवर बहारदार नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
वर्षभर अभ्यास, अभ्यास विषयक वेगवेगळे उपक्रम यातून जरा मोकळा वेळ मिळावा, विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना यातून निखळ आनंद मिळावा, त्यांचे मनोरंजन व्हावे या हेतूने वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सुंदर दर्शन
मुलींना वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकायला मुळातच आवडते. याप्रसंगी 'हलगी वाजली' या गीताने सर्वांनाच ठेका धरायला लावला. 'पिचली माझी बांगडी', 'मुळीच नव्हतं रे कान्हा' या गवळणींनी कार्यक्रमाला अगदी बहार आणली. तसेच 'मंगळागौर गीत', 'सुपात जोंधळ घोळीते' अशा गाण्यांतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे खूप सुंदर दर्शन घडवले. 'कुऱ्या चालल्या रानात' या गीतामधून शेती आणि शेतकरी याबद्दल मुलींनी आपले प्रेम व आदर व्यक्त केला. त्याबरोबरच 'हिची चाल तुरुतुरु', 'गाणं वाजू द्या', 'नको मला साडी' अशा गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. तर छोट्यांच्या 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला'अशा गाण्यांनी कार्यक्रमाचा गोडवा वाढवला.
पालकांकडून उत्स्फूर्त दाद
अशाप्रकारे कार्यक्रम खुलवत - खुलवतच 'मोबाईलचा अतिवापर टाळा' असा संदेश देणाऱ्या नाटुकल्या सादर करायलाही विद्यार्थिनी विसरल्या नाहीत. कार्यक्रमाचे सर्वांग सुंदर, परिपूर्ण असे सादरीकरण झाले. बहारदार गीतांना पालकांनी अगदी उत्स्फूर्तपणे दाद दिली, बक्षिसेही दिली.
संमेलनाला मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला मसूर गावच्या पोलीस पाटील सौ. तिलोत्तमा वेल्हाळ, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, सिकंदर इनामदार, सामाजिक कार्यकर्ते भूषण पटेल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदेश जगदाळे, उपाध्यक्ष वैभव गुरव, सदस्य साक्षी फडतरे, पूजा साळुंखे, स्वाती जंगम, अमित जगताप, प्रशांत वाघ यांच्यासह पालक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बाजारे, सहशिक्षक सुनिता तोडकर, सुरेखा जगदाळे, स्वाती बाजारे, लक्ष्मीकांत जाधव यांनी परिश्रम घेतले. तसेच या कामी त्यांना राजश्री बनकर, सारिका हस्ते, विक्रम जगदाळे, निलेश कुंभार, वसीम मोमीन यांनी बहुमोल असे सहकार्य दिले. लाईट व साऊंड सिस्टिम व्यवस्था गणेश लोहार यांनी केली. सूत्रसंचालन सौ. स्वाती बाजारे यांनी केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या