Satara News : सातारा 100% ... मतदान करणारच


सातारा लोकसभा निवडणुकीसाठी अनोख्या अंदाजात जनजागृती 

Satara News : जावली तालुक्यातील मुनावळे येथे एमटीडीसी पर्यटन केंद्र यांच्या सहकार्यातून बोटीच्या सहाय्याने मतदारांना सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची तारीख 7 मे, सातारा 100 % व मी मतदान करणारच असे संदेश अभिनव उपक्रमातून देण्यात आले.

या कार्यक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांचे होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्रभावती कोळेकर, जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, सातारा नगरपालिका तसेच संबंधित गावचे ग्रामसेवक यांनी प्रयत्न केले.

मतदानाचा टक्का वाढण्यास मदत

सातारा स्वीप कक्षामधील किरण कांबळे व राजेंद्र भोसले यांनी कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करून येणाऱ्या पर्यटकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती केली. हा उपक्रम जनजागृतीचा एक अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रम ठरला असून याद्वारे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निश्चित मदत होईल असा विश्वास निर्माण झाला आहे.

Loksabha Election Voting Awareness program, Satara Loksabha constituency, Satara Zp CO Yashni Nagarajan

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या